महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळेच्या वेळेत मुख्यध्यापिका कुलूप लावून गायब; शिक्षक बाहेरच ताटकळत - zp school

भुतडा या शिक्षण विभागाच्या नव्हे, तर आपल्याच मनाने शाळेचा कारभार चालवतात. कधी-कधी तर त्या दिवसभर शाळाच उघडत नाहीत, तर कधी अर्ध्यातूनच शाळेला सुट्टी देतात, अशा तक्रारी येथील शिक्षकांनी केल्या आहेत.

शाळेच्या वेळेत मुख्यध्यापिका कुलूप लावून गायब; शिक्षक बाहेरच ताटकळत

By

Published : Apr 16, 2019, 8:40 AM IST

हिंगोली -विद्यार्थी आणि शिक्षक यांची जराही पर्वा न करता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेच्या वेळेत शाळेला कुलूप लावून दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. आर. एस. भुतडा असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. त्यामुळे शाळेच्या २ शिक्षिका आणि १ कर्मचारी बंद खोलीसमोर ताटकळत बसले होते. शेवटी शाळेची वेळ संपल्यावर त्यांनी आपली उपस्थिती लिखित स्वरुपात गटविकास अधिकाऱ्याकडे दर्शविली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शाखा क्रमांक २, केंद्र सदर बाजार, हिंगोली येथे आर. एस. भुतडा मुख्यध्यापीका म्हणून कार्यरत आहेत. या शाळेत इयता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत. तर शाळेची वेळ ही १० ते १ अशी आहे. या शाळेची विद्यार्थी संख्या ८५ इतकी आहे. भुतडा या शिक्षण विभागाच्या नव्हे, तर आपल्याच मनाने शाळेचा कारभार चालवतात. कधी-कधी तर त्या दिवसभर शाळाच उघडत नाहीत, तर कधी अर्ध्यातूनच शाळेला सुट्टी देतात, अशा तक्रारी येथील शिक्षकांनी केल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप होत नसल्याचा प्रकारही समोर आला आहे.

शाळेच्या वेळेत मुख्यध्यापिका कुलूप लावून गायब; शिक्षक बाहेरच ताटकळत

ही शाळा शहराच्या अतीमध्यम भागात असल्याने शाळेसमोर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र, याबद्दल काहीच विचार न करता मुख्यध्यापीका विद्यार्थ्यांना शाळेच्या अर्ध्या वेळातूनच सुट्टी देतात. येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आपल्या मनाप्रमाणे वागणूक देत असल्याच्याही तक्रार शिक्षकांनी केली आहे. या सर्व प्रकाराकडे शिक्षण विभागाचे मात्र, साफ दुर्लक्ष असल्याचे दिसते.
येथील शिक्षक शोभा श्रीराम भाले, संगीता त्र्यंबक भाले, त्रिरत्न भरत कांबळे हे शिक्षक आणि कर्मचारी गजानन वसंत तायडे हे चौघे शाळेच्या वेळात शाळेत पोहोचले. मात्र, कार्यालयाला कुलुप असल्याने शिक्षकांनी मुख्यधपिकेला फोनवरून संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, मुख्यध्यापिकेने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिक्षक शाळेच्या वेळेत कुलूपबंद कार्यालयासमोर ताटकळत उभे होते.
मागील अनेक वर्षांपासून शाळेत हा प्रकार सुरू आहे. अनेकदा शिक्षकांनी वरिष्ठांकडे लिखित कळविले. तरीही याबाबत अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता हा गंभीर प्रकार मला आजच माहित झाला. लगेच मी या शाळेची चोकशी करण्याच्या सूचना विस्तार अधिकाऱ्याला देतो आणि यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details