महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईलची फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करताना स्फोट; १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी

मोबाईलची फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटरीने स्फोट घेतला. त्यामुळे एका १० वर्षीय मुलाच्या हाताला मोठी इजा झाली आहे.

जखमी चैतन्य

By

Published : Sep 21, 2019, 8:06 PM IST

हिंगोली- सद्या लहानांसह वयोवृद्धांना मोबाईलचे वेड लागलेले आहे. वसमत तालुक्यातील आरळ येथे एका बालकाने मोबाईल मधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न करत असताना बॅटरीचा स्फोट होऊन बालकाचा हात पूर्णपणे भाजला आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळी 11 च्या सुमारास घडली.

माहिती सांगताना जखमी चैतन्यची आई

चैतन्य गंगाधर चव्हाण (वय 10 वर्षे) असे बालकाचे नाव आहे. चैतन्य हा मोबाईल घेऊन अंगणात खेळत होता. मोबाईलची बॅटरी फुगलेली असल्याने, ती मोबाईलमधून सतत पडत होती. त्यामुळे चैतन्याने फुगलेली बॅटरी दगडाच्या सहाय्याने सरळ करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्या बॅटरीवर दगड मारला तोच त्या बॅटरीचा जोराने स्फोट झाला. स्फोटानंतर चैतन्य जोराने आई म्हणून ओरडला. त्यामुळे आईने चैतन्यकडे धाव घेतली. त्यावेळी चैतन्यचा हात पूर्णपणे रक्ताने माखलेला दिसला. चैतन्य जोर-जोरात रडत होता. स्फोट झाल्याने बऱ्याच जणांनी धाव घेतली होती. त्याला तात्काळ नांदेड येथे उपचारासाठी हलविले. चैतन्याच्या हाताला मोठे छिद्र आणि हाताच्या पाठमागील भागास ही मोठ्या चिरा पडल्याचे दिसून आले.

हेही वाचा - पंधराशे रुपयाची लाच घेताना ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होत होता. नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात चैतन्यवर उपचार सुरू आहेत. आता प्रकृती स्थिर असली तरी चैतन्य घाबरलेल्या स्थितीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details