हिंगोली- जिल्ह्यात गुटख्याच्या तस्करीचे प्रकार सुरूच आहेत. रविवारी गुन्हे शाखेच्या पथकाने एका चारचाकीमधून 3 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली तालुक्यातील नरसी परिसरात एका चारचाकीमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या परिसरात वाहनांच्या तपासणीला सुरुवात केली. तपासणीदरम्यान पोलिसांना या चारचाकीमध्ये गुटखा आढळून आला. पोलिसांनी संबंधित चारचाकी आणि 3 लाखांचा गुटखा असा एकूण 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गोपाल आत्माराम रंजवे व विनोद भागवत रंजवे अशी या आरोपींची नावे आहेत.