हिंगोली- टाळेबंदीच्या काळातही गुटखा माफिया सर्रासपणे गुटख्याची वाहतूक व विक्री करीत आहेत. सेनगाव परिसरात गुटखा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 29 जुलै मध्यरात्री सेनगाव येथे छापा टाकला. यावेळी घटनास्थळी 5 लाख 20 हजार रुपयांचा गुटखा व एक 6 लाख रुपये किंमतीची एक जीप, असा 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमालासह तीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचा सेनगाव येथे छापा, 11 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त - hingoli police news
हिंगोलीतील सेनगाव येथून 5 लाख 20 हजारांचा गुटखा व 11 लाखांची जीप, असा 11 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केल आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या तक्रारीवरून तीन जणांविरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात अजूनही चोरीछुपे सर्रासपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे या कारवाईतून प्रखरपणे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेनगाव येथील सतीश खाडे हा गुटख्याची चोरट्या पद्धतीने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. एवढेच नव्हे तर आरोपी हे त्याच्या राहत्या घरात तिने शेड करून त्यामध्ये गुटख्याची साठवणूक करत होता. याची संपूर्ण माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नेवारे यांच्या पथकाने 29 जुलै रोजी मध्यरात्री यामध्ये पाच लाख वीस हजार रुपये किमतीचा गुटखा व एक जीप ताब्यात घेतली. जप्त गुटखा सतीश कुंडलिक खाडे, दिगविजय सतीश खाडे, सुरेश राजपाल मुंडे हे स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
एवढेच नव्हे तर बंदी असतानाही, हे सर्व जण नेहमी या शेडमध्ये हा गुटखा ठेऊन याची इतरत्र विक्री करीत होते. त्यामुळे सतीश कुंडलिकराव खाडे, दिगविजय सतीश खाडे, सुरेश राजपाल मुंडे, या तिघांविरोधात सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कररण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवसांब देवारे यांच्या पथकाने केली.