हिंगोली- शहरातील वंजारवाडा परिसरातील कयाधु नदी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा घेऊन जाणाऱ्या कारसह दोघांना ताब्यात घेतले आहे. मुंजाजी योगाजी हंगडे (गाडी चालक), लक्ष्मण अंशीराम उन्हाळे (व्यापारी) अशी आरोपींची नावे आहेत.
हिंगोलीत पावणे तीन लाखांचा गुटखा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - स्थानिक गुन्हे शाखा
कयाधु नदी परिसरातून एका कारमधून गुटका येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार या परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि गाडीची तपासणी केली असता गुडख्यासह दोघांना ताब्यात घेण्याच आले.

यावेळी १ लाख ५० हजारांचा गुटखा तर कार असा २ लाख ८६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनी जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या बालाजी बोके, सुनील अंभोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत यांनी केली.