महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ढोल ताशाच्या गजरात निघाली शोभायात्रा, लहान मुलांचे भजनी मंडळ ठरले आकर्षण - शोभायात्रा

यावर्षी काढलेल्या शोभायात्रेत भजनी मंडळ, ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत महिलांनी नृत्य सादर केले.

हिंगोली गुढीपाडवा शोभायात्रा

By

Published : Apr 6, 2019, 2:14 PM IST

हिंगोली - दरवर्षीप्रमाणे श्री नरेंद्रस्वामी सेवा शिष्टमंडळाकडून गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष सहभागी झाले होते. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत महिलांनी नृत्य सादर केले.

हिंगोली गुढीपाडवा शोभायात्रा

यावर्षी काढलेल्या शोभायात्रेत भजनी मंडळ, ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या महिलांच्या हातात नरेंद्रस्वामी यांचे सुविचार लिहिलेले फलक, महिलांच्या डोक्यावर कळस होता. शोभायात्रेत हजारोंच्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. लहान मुलांचे भजनी मंडळ सर्वांचे आकर्षण ठरत होते. तालासुरात गायले जाणारे गाणी आणि लहान मुले लक्ष वेधून घेत होती. ढोल ताशाच्या गजरात महिलांनी ठेका धरला होता.

नांदेड नाका परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून शोभायात्रेची सुरुवात करण्यात आली होती. शहरातील मुख्यमार्गावरून निघून पुन्हा विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातच यात्रेचा समारोप करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details