हिंगोली -जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडले ध्वजारोहण - Hingoli flag hoisting
आज देशभरात ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. हिंगोलीमध्ये पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहण
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी अनेक गावातील नागरिकांनी उपोषण सुरू केले होते. त्यांच्या मागण्यांचे निवेदन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वीकारले.