हिंगोली - सलग दहा दिवस चाललेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. यामुळे सोयाबीनसह खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
पालकमंत्री नुकसानग्रस्त भागाच्या दौऱ्यावर; शंभर टक्के भरपाईची शेतकऱयांची मागणी
सध्या दुष्काळ दौऱ्यावर आसलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी नुकसानाबद्दल कैफियत मांडली. यावेळी, शेतकऱयांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे पालकमंत्र्यांनी मान्य केले असून, पूर्ण भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री अतुल सावे येणार असल्याने पहाटे सहा वाजल्यापासून विविध भागातील शेतकरी आपल्या बांधावर जमले होते. पालकमंत्र्यांनी सर्वप्रथम येलदरी भागातून पाहणीस सुरुवात केली. यावेळी पावसाने भिजलेले सोयाबीन शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना दाखवल्यानंतर, नासाडी झालेल्या पिकांचा पूर्ण मोबदला सरकाकडून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.