महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 23, 2019, 7:44 AM IST

ETV Bharat / state

हिंगोलीत शेकडो रोहित्र दाखल; आमदार बांगर यांनी सभागृहात केली होती मागणी

हिंगोली जिल्ह्यातील रोहित्राचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न मांडताच, हिंगोलीत शेकडो नवीन रोहित्र दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा रोहित्राचा प्रश्न कायम सुटण्यास मदत होणार आहे.

hingoli
हिंगोलीत शेकडो रोहित्र झाले दाखल

हिंगोली - जिल्ह्यात रोहित्राचा (ट्रान्सफार्मर) प्रश्न गंभीर झाल्याने अनेक शेतकऱ्यांना वीज पुरवठ्याबाबत अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच वारंवार रोहित्र जळाल्याने रब्बीच्या पिकालाही पाणी देणे कठीण होऊन बसले होते. हा गंभीर प्रश्न कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी हिवाळी अधिवेशनात मांडताच, हिंगोलीत शेकडो नवीन रोहित्र दाखल झाले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा रोहित्राचा प्रश्न कायम सुटण्यास मदत होणार आहे.

हिंगोलीत शेकडो रोहित्र झाले दाखल

हिंगोली जिल्ह्यातील रोहित्राचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. रब्बी पिके जगविण्यासाठी शेतकरी पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, वारंवार रोहित्र जळत असल्याच्या घटनेमुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांची पिके पाण्यावाचून सुकू लागली आहेत. त्यातच वीज वितरण कंपनीकडून रोहित्र लवकर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. शेतकऱ्यांची ही अडचण समजून घेत आमदार बांगर यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये रोहित्राचा प्रश्न मांडला होता.

हेही वाचा - ...अन् ही कसली कर्जमाफी; ही तर या सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टाच

आता दाखल झालेल्या रोहित्रांमुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तर २०१५-१६ मध्ये कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्यांना आता शेतात वीज घेण्यासाठी कुठे आकडा किंवा चोरून वीज घेण्याची अजिबात गरज नाही. कारण, त्या ग्राहकांसाठी १६ हॉर्स पावरचे शेकडो रोहित्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे आता निश्चितच शेतकऱ्यांची गैरसोय कमी होण्यासाठी मदत होणार आहे. मात्र, दाखल झालेले रोहित्र वेळेत उपलब्ध व्हावेत हीच अपेक्षा.

हेही वाचा -जवानाच्या पत्नीला व्हॉट्सअ‌ॅपवरून अश्लील संदेश पाठवने दुसऱ्या जवानाच्या अंगलट

ABOUT THE AUTHOR

...view details