हिंगोली - खादी ही पूर्णतः कापसापासून बनविली जाते. तिचा वापर इतर कपड्यांच्या तुलनेत सर्वाधिक जास्त केला तर आपले आरोग्य ठणठणीत राहील. खादीला मागणी वाढल्यास कपाशीची देखील मागणी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या कापसाला जास्त भाव मिळेल. त्याचबरोबर निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर मिळून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे हिंगोली येथे गंगाप्रसाद अग्रवाल खादी प्रचार - प्रसार अभियानाच्या समारोपप्रसंगी संयोजक तथा आयोजक विशाल आग्रवाल यांनी सांगितले.
हिंगोलीत गंगाप्रसाद अग्रवाल खादी प्रचार-प्रसार अभियानाची सांगता - exhibition
शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेल्या कापसाला जास्त भाव मिळेल. त्याचबरोबर निसर्गासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना धीर मिळून उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचे हिंगोली येथे गंगाप्रसाद अग्रवाल खादी प्रचार - प्रसार अभियानाच्या समारोपप्रसंगी संयोजक तथा आयोजक विशाल आग्रवाल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात व्रतस्थ खादी धारी तथा सर्वोदयी विचारवंत गंगाप्रसाद अग्रवाल खादी प्रचार- प्रसार मराठवाडा पातळीवरील अभियानाचा हिंगोली येथे बुधवारी समारोप झाला. या समारोप प्रसंगी मोठ्या प्रमाणात खादीच्या कपड्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी खादी कपड्याची खरेदी केली. हे अभियान ९ ते २० फेब्रुवारी दरम्यान कुरुंदा येथून सुरू झाले. ओंढा- नागनाथ, जिंतूर, सेनगाव, पाथरी, मंठा, माजलगाव, मानवत, गंगाखेड या ठिकाणी राबवण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या सेवाग्राम आश्रम पुरस्कृत खादीचा प्रचार प्रसार करणाऱ्या 'जय जागर' रथाद्वारे हिंगोलीतील गांधी चौकात हे अभियान राबविण्यात आले.