हिंगोली - देशासह राज्यभरात गणपती विसर्जनाची धूम सुरू आहे. जिल्ह्यातही भक्तिभावाने आपल्या लाडक्या गणरायाला गुलाल आयोजित फुलांची उधळण करून गणेश भक्तांनी निरोप दिला. जिल्हाभरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने विसर्जन मिरवणूक मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. याचबरोबर या मार्गावर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची बारकाईने दक्षता घेतली होती. यावर्षी जिल्ह्यात एक हजार 314 गणेश मंडळाच्या वतीने आपल्या लाडक्या गणरायाची स्थापना केल्याची नोंद पोलिस प्रशासनाकडे झाली.
हेही वाचा -परदेशातही बाप्पाची धूम, बहरीन देशात गणेश विसर्जन उत्साहात
गणरायाच्या आगमनाने दहा दिवस भक्तीत न्हाऊन निघालेल्या गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला जड मनाने निरोप दिला. विशेष म्हणजे अनेक गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाच्या आव्हानास प्रतिसाद देत अतिशय साध्या पद्धतीने ढोल-ताशाच्या गजरात लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली. शहरात गुरुवारी विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. त्यामुळे शहरात दिवसभर भाविकांची रेलचेल पाहावयास मिळाली. तर दुपारी ३ नंतर घरगुती गणेश मूर्तीसह सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा -रत्नागिरीत गणेश विसर्जनावेळी दोन मुले खाडीपात्रात बुडाली; शोधकार्य सुरू