महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रवणयंत्र विसरले अन् काळाने घाला घातला; 11 मार्चला होते लग्न - शेतात कामासाठी जाणाऱ्या भावी वराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी जाणाऱ्या भावी वराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. 11 मार्चला बोहल्यावर चढणार होता.

लक्ष्मण नरोटे
लक्ष्मण नरोटे

By

Published : Feb 19, 2020, 11:24 PM IST

हिंगोली- नेहमीच कानातील श्रवणयंत्र वापरणाऱ्या एका भावी नवरदेवाचे कानातील श्रवणयंत्र घरीच विसरल्याने पूर्णा-अकोला रेल्वे मार्गावरील नांदुरा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या हरवाडी शिवारात मूकबधिर युवकाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला.

लक्ष्मण किसन नरोटे (वय 21 वर्षे), असे मृत युवकाच नाव आहे. लक्ष्मण हा नेहमीच श्रवणयंत्र वापरत होता. मात्र, आज श्रवणयंत्र घरीच विसरून तो नेहमी प्रमाणे शेतात जाण्यासाठी निघाला होता. सकाळी साडेआठ वाजता तो जात असता, पूर्णा-अकोला मार्गे जाणाऱ्या रेल्वेच्या धडकेत तो जखमी झाला. श्रवणयंत्रच कानात नसल्याने, त्याला रेल्वेचा आवाज अथवा हॉर्न अजिबात ऐकू आला नसल्याचे बोलले जात आहे. यात त्याला रेल्वेची धडक लागली. जखमी अवस्थेत युवक रुळाच्या बाजूला पडला. घटनेची माहिती मिळतात नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी लक्ष्मणला उपचारासाठी कळमनुरीकडे हलविले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच उमरा फारठ्यावर त्याचा मृत्यू झाला.

लक्ष्मणचा 11 मार्चला विवाह होता. लग्नपत्रिकही छापल्या होत्या. दोन्ही ही कुटुंबात आनंदाचे वातवरण होते. विवाह समारंभांच्या खरेदीची रेलचेल देखील सुरू होती. मात्र, या घटनेने सर्वच स्वप्नांचा चुराडा झाला. दोन्ही कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली. दुपारी 2 वाजता लक्ष्मणवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा -हिंगोलीत मूकबधीर सालगडी वेदनेच्या छायेत...पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details