महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मम्मी-मम्मी बघना पप्पांना चटके बसतायेत! राजीव सातव यांच्या मुलीच्या उद्गाराने उपस्थितांना अश्रू अनावर

राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा पुष्कराजने वडिलांना मुखाग्नी दिला. दरम्यान राजीव सातव यांना मुखाग्नी देताच त्यांच्या मुलीने आपल्या आईला घट्ट मिठी मारली, आणि 'मम्मी-मम्मी बघना पप्पांना चटके बसत आहेत' असे ती म्हणाली. तिच्या या उद्गाराने उपस्थितांचे डोळे पाणावले, या चिमुकलीला काय सांगावे, हे कोणालाच काही कळलं नाही.

राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार
राजीव सातव यांच्यावर अंत्यसंस्कार

By

Published : May 17, 2021, 5:45 PM IST

Updated : May 17, 2021, 6:01 PM IST

हिंगोली- राजीव सातव यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांना धक्का बसला. आज राजीव सातव यांच्या पार्थिवावर कळमनुरीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा पुष्कराजने वडिलांना मुखाग्नी दिला. दरम्यान राजीव सातव यांना मुखाग्नी देताच त्यांच्या मुलीने आपल्या आईला घट्ट मिठी मारली, आणि 'मम्मी-मम्मी बघना पप्पांना चटके बसत आहेत' असे ती म्हणाली. तिच्या या उद्गाराने उपस्थितांचे डोळे पाणावले, या चिमुकलीला काय सांगावे, हे कोणालाच काही कळलं नाही.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

खा. राजीव सातव यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झाला आहे. कळमनुरी येथील त्यांच्या कोहिनुर निवासस्थानी सातव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अतिशय शांततेत सर्वांनी अंत्यदर्शन घेतले. अंत्यदर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाला अश्रू अनावर झाले. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मुलगा पुष्कराज याने वडिलांना मुखाग्नी दिला. मुखाग्नी देताच त्यांच्या मुलीने आपल्या आईला घट्ट मिठी मारली, 'मम्मी-मम्मी बघना पप्पांना चटके बसत असल्याचे ती म्हणाली. तिच्या या वाक्याने उपस्थितांना अश्रू अनावर झाले, या मुलीची समजूत कशी काढावी, तिला काय सांगावे असा प्रश्न त्यांना पडला.

हेही वाचा -डॉक्टरअभावी अकोला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बंद, सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू - देवेंद्र फडणवीस

Last Updated : May 17, 2021, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details