हिंगोली- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे रुग्ण हिंगोली जिल्ह्यातही दिवसेंदिवस वाढत आहेत. आज हिंगोली आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात आणखी चार जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये तीन जवानांचा समावेश आहे, तर एकजण जालना येथील जवानांच्या संपर्कात आलेला रुग्ण आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 20 वर पोहोचली आहे.
हिंगोलीतील चार जणांना कोरोनाची लागण; रुग्णांची संख्या 20 वर - lockdown in hingoli
हिंगोली जिल्ह्यातील एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर प्रशासनासह हिंगोलीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, गेल्या 24 तासात आणखी 4 रुग्ण आढळल्याने हिंगोलीकरांची धाकधूक वाढली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी तिघे मुंबई आणि मालेगाव येथून बंदोबस्त आटोपून आले होते
हिंगोली जिल्ह्यातील एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन घरी गेल्यानंतर प्रशासनासह हिंगोलीकरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र, गेल्या 24 तासात आणखी 4 रुग्ण आढळल्याने हिंगोलीकरांची धाकधूक वाढली आहे. नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी तिघे मुंबई आणि मालेगाव येथून बंदोबस्त आटोपून आले होते. हे रुग्ण आणखी किती जणांच्या संपर्कात आले होते याचा तपास सध्या सुरू आहे. त्यामुळे, हिंगोलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.