हिंगोली - कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व आर्थिक गणितेच विस्कटली आहेत. हिंगोलीतील फुल उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे. झाडाची पाने गळू नये म्हणून फुले रोजच्या रोज तोडावी लागत आहेत. तर काही ठिकाणी झाडालाच वाळून गेलेल्या फुलांची झाडेच उपटून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील शेतकरी चंद्रकांत गौबाडे, चंद्रकांत ऋषी हे गेल्या अनेक वर्षांपासून फुल शेती करतात. यांच्या शेतात लिली, शेवंती, अश्वगंधा, निशिगंधा आदी प्रकारची फुले आहेत. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी विवाह समारंभ, मंदिराचे बंद ठेवण्यात आले आहेत.