हिंगोली- राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानांवर कोरोनाबाधित झाल्याने औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 6 कोरोनाबाधित जवानांपैकी 5 जवान कोरोनामुक्त झाले आहेत. जवानांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला, तर आता केवळ एका जवानावर उपचार सुरू आहेत. वसमत येथील रुग्णालयात 9 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जवान कोरोनामुक्त झाल्याने हिंगोलीकरांची चिंता मिटली असली तरी दिवसेंदिवस मुंबई, पुणे, औरंगाबाद येथून चोरट्या मार्गाने येत असलेला व्यक्तींमुळे चिंता वाढत आहे.
हिंगोलीकरांची चिंता मिटली... एसआरपीएफचे पाच जवान कोरोनामुक्त - एसआरपीएफचे 5 जवान कोरोनामुक्त
मुंबई आणि मालेगावमधील कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात बंदोबस्त करुन एसआरपीएफचे जवान परतले होते. या जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने चिंता वाढली होती. औरंगाबाद येथील खासगी रुग्ण्लायात 6 जवानांवर उपचार सुरू होते. 5 जवान कोरोनामुक्त झाले असून एकावर उपचार सुरू आहेत.
हिंगोली येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली आहे. त्यापैकी आतापर्यंत 90 रुग्ण हे बरे झाले असून, त्याना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. 10 कोरोनाबाधित रुग्णांपैकी वसमत येथील रुग्णालयात 9 तर 1 जवानावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई आणि मालेगावमधील कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रातून हे जवान बंदोबस्त करुन परतले होते. त्यांच्यातील एक एक जवान कोरोनाबाधित निघत होते, तसतशी हिंगोलीकरांची चिंता मात्र वाढत होती.आरोग्य विभाच्या यशस्वी उपचारांनंतर जवानांचे अहवाल हे निगेटिव्ह येत असल्याने, हिंगोलीकरांनी व प्रशासनाने देखील सुटकेचा श्वास सोडला.
आता केवळ एक जवान औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत असून इतर 9 रुग्ण हे वसमत येथील आयसोलेशल वार्डमध्ये उपचार घेत आहेत. त्यांची ही प्रकृती स्थिर असून, अजून तरी कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याची माहिती आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशा सूचना आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.