हिंगोली -कळमनुरी येथे हुतात्मा स्मारक परिसरात नगर परिषदेच्या वतीने करोडो रुपये खर्च करून, तीन ते चार वर्षापूर्वी उद्यायान उभारले आहे. मात्र, ते नागरिकासाठी अजुनी उघडे करण्यात आले नव्हते. शेवटी दोन दिवसांपूर्वी येथे मनसेच्या वतींने बच्चे कंपनीने आंदोलन करून या उद्यानाचे दार उघडे करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर मुख्याधिकार्यांनी दार उघडे करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुठे ते आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, लागलीच दुसऱ्या दिवशी या उद्यानाला अचानक आग लागून यामध्ये लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मुद्दाम हून ही आग लावल्याचा आरोप नागरिकांतून केला जातोय.
कळमनुरी येथे नगरपरिषदेच्या वतीने करोडो रुपये खर्च करून भव्य उद्यान उभारण्यात आले होते. मात्र, आजतागायत या उद्यानाची दारे उघडी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उद्यानातील खेळणी शोभेच्या वस्तु तर बनल्या होत्या. अजूनही भयानक बाब म्हणजे या ठिकाणी देखरेखीसाठी ठेवण्यात आलेले मजूर साफ-सफाई कडे दुर्लक्ष करत असल्याने उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. मात्र, या गवतामुळे आज अचानक उद्यानात पेट घेतल्याने यामध्ये बच्चेकंपनीसाठी प्रतीक्षा करत असलेले साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेने कळमनुरी येथील बच्चेकंपनीसह नागरिक चांगलेच संतापून गेलेले आहेत. या उद्यानाची दारे उघडी करावीत यासाठी गेल्या काही वर्षापासून नागरिकांची मागणी सुरूच होती.मात्र, त्या मागणीला नगर पालीकेकडुन नेहमीच केराची टोपली दाखवली जात होती. शेवटी उद्यानाची होळी झाली अन यामध्ये करोडो रुपयांचा निधी खाक झाला आहे.
अग्निशमन दलाचे वरती माघून घोडे -
उद्यानात लागलेली आग ही संपूर्ण गवत व साहित्य जळून खाक झाल्यानंतर आपोआप विझली. शेवटी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने धाव घेऊन, आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तो पर्यन्त मात्र आग ही पूर्णपणे विझून गेलेली होती. यावरूनच अग्निशमन दलासह नगर परिषद किती तत्पर आहे याचा प्रत्यय आला.
आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात -