महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल - प्रक्षोभक भाषण

शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रेचे आयोजन केले जाते. कळमनुरीवरून कावड यात्रा आल्यानंतर बांगर यांनी शिवभक्तांना व कावड यात्रेकरूंना मार्गदर्शन करताना हल्लेखोरांमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर लढा, असे खुले आव्हान दिले होते.

हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर

By

Published : Aug 19, 2019, 9:14 AM IST

हिंगोली- येथे दरवर्षीच शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कावड यात्रेचे आयोजन केले जाते. कळमनुरीवरून कावड यात्रा आल्यानंतर बांगर यांनी शिवभक्तांना व कावड यात्रेकरूंना मार्गदर्शन करताना हल्लेखोरांमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर लढा, असे खुले आव्हान दिले होते. त्यामुळे बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त आयोजित केलेल्या भव्यदिव्य कावड यात्रेवर 12 ऑगस्टला दगडफेक केली होती. त्यामुळे वातावरण गंभीर बनले होते. जेव्हा कळमनुरीहून हिंगोलीत कावड यात्रा आली तेव्हा शिवसैनिक व शिवभक्तांच्या आग्रहाखातर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भाषण केले होते. या भाषणात हिंमत असेल तर समोरासमोर येऊन लढा, असे खुले आव्हान त्यांनी दिले होते. तसेच या भाषणादरम्यान बांगर यांनी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंवर झालेला अन्याय वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसार सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

या घटनेला सहा दिवस उलटल्यानंतर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी 18 ऑगस्टला शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर हिंदू देवदेवतांचे व धर्माचे दाखले देऊन हिंगोलीच्या नांदेड नाका भागात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा स्वतः फिर्याद देऊन दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details