महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत तीन लाखांची लाच मागणाऱ्या तहसीलदाराविरुद्ध गुन्हा दाखल

वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी हिंगोली शहर पोलिसांनी वाळूचे पाच टिप्परवर कारवाई केली. पुढील कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार यांना पत्र दिले होते. त्यामुळे पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यासाठी तहसीलदार माचेवाड यांनी तक्रार दाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागतल्याची तक्रार 25 मे रोजी लाच लुचपत विभागाकडे केली होती.

तहसीलदार
तहसीलदार

By

Published : Jun 1, 2021, 10:16 PM IST

हिंगोली -कोरोना महामारीतही अधिकाऱ्यांच्या लाच घेण्याचे प्रकार सुरूच आहेत. तहसीलदाराने तक्रार दाराकडून पकडलेल्या पाच टिप्परवर कारवाई करून, सोडून देण्याच्या मागणीसाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तहसीलदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पांडुरंग माचेवाड असे तहसीलदाराचे नाव आहे. रात्र-दिवस वाळूची चोरटी वाहतूक होत आहे. त्या अनुषंगाने मागील वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी हिंगोली शहर पोलिसांनी वाळूचे पाच टिप्परवर कारवाई केली. पुढील कारवाई करण्यासंदर्भात तहसीलदार यांना पत्र दिले होते. त्यामुळे पुढील कारवाई लवकरात लवकर करण्यासाठी तहसीलदार माचेवाड यांनी तक्रार दाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागतल्याची तक्रार 25 मे रोजी लाच लुचपत विभागाकडे केली होती. त्यावरून लाचलुचपत विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, तीन लाख रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी संमती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

...म्हणून केला गुन्हा दाखल

माचेवाड यांनी पाचही टिप्पर सोडवण्यासाठी तक्रार दाराकडून तीन लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने थेट लाचलुचपत कार्यालय गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केली असता यात तहसीलदार लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक नीलेश सूडकर, पो. हे. कॉ. विजय उपरे, पो. ना. तान्हाजी मुंढे आदीने केली आहे.

हेही वाचा-माळेगाव गोळीबार प्रकरणी पाच तासात चार जण अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details