हिंगोली -संभाजी भिडे हे नेहमीच त्यांच्या वक्तव्याने चर्चेत राहतात. त्यांच्या विरोधात किरण घोंगडे यांनी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोरोना हा रोगच नाही आहे. कोरोनाने जी माणस मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात, असे वक्तव्य त्यांनी केले होते.
संपूर्ण देशभरात कोरोना ने प्रत्येक जण हैराण झालेले आहे. कित्येक जणांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या भयंकर महामारीमुळे कित्येक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. तक्रारदार किरण घोंगडे यांना देखील कोरोना झालेला होता. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना भिडे यांच्या वक्तव्यामुळे घोंगडे यांना अपमानित वाटत आहे. त्यामुळे त्यांनी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.