नांदेड - केंद्राच्या निधीअभावी हिंगोली लोकसभा मतदारसंघात घरकुल योजना रखडली होती. त्याची तात्काळ दखल घेऊन खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ मंजूर व्हावा, यासाठी केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदिप सिंग पुरी यांची भेट घेऊन मतदार संघासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला. हिमायतनगरसाठी सर्वाधिक ६ कोटी ६१ लक्ष रुपयाचा सर्वाधिक निधी मंजूर झाला असून एकूण १० हजाराच्यावर घरकुल लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
निम्मे हप्ते न मिळाल्याने घर राहिली होती अर्धवट
सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीचे स्वप्न असते की आपले स्वतःचे एक घर असावे. या स्वप्नपूर्तीसाठी 'सर्वांसाठी घरे' या संकल्पनेतून देशात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आली. मात्र एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही अनेक लाभार्थ्यांना अद्याप त्यांचे निम्मे हप्ते न मिळाल्याने त्यांची घरे अर्धवट राहिली होती. हिंगोली लोकसभा मतदार संघातील नगर परिषद आणि नगर पंचायती अंतर्गत घरकुल योजनेचा निधी कोरोनाच्या काळात कित्येक दिवसापासून रखडला होता. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते, निधीअभावी घरकुलाची कामे खोळंबली होती.
१० हजार ५७४ घरकुलांसाठी एकूण ५० कोटी......!