महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत गायींची वाहतूक करणारी पिकअप गाडी उलटली; ५ गायी जखमी - accident

गायींची वाहतूक करणारी पिकअप गाडी नवीच आहे. एवढेच नाही, तर गाडीची पासिंगदेखील करण्यात आलेली नाही. या गाडीतून रात्रीच्यावेळी गायींची वाहतूक केल्याने या गायी गोहत्येसाठी तर नेल्या जात नव्हत्या ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.

आग विझवताना अग्निशमन दल

By

Published : Jun 25, 2019, 11:28 AM IST

Updated : Jun 25, 2019, 7:37 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील वसमत-कुरुंदा मार्गावर गायी घेऊन जाणारी पिकअप गाडी उलटली. या अपघातात चार ते पाच गायी गंभीर जखमी झाल्याचा अंदाज आहे. या गाडीत अडकलेल्या गायींची ग्रामस्थांनी सुटका केली. अपघातानंतर संबंधित पिकअप गाडी पेटवून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझवली.

गायींची वाहतूक करणारा ट्रक जळताना
वाहन उलटल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. येथे पोहोचलेल्या ग्रामस्थांना काही गायी गाडीत अडकलेल्या आढळून आल्या. त्यांनी त्या गायींची सुटका केली. तसेच चालकाचा शोध घेतला. मात्र. त्याठिकाणी कुणीही दिसून आले नाही. त्यानंतर वसमत पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
गायींची वाहतूक करणारी पिकअप गाडी नवीच आहे. एवढेच नाही, तर गाडीची पासिंगदेखील करण्यात आलेली नाही. या गाडीतून रात्रीच्यावेळी गायींची वाहतूक केल्याने या गायी गोहत्येसाठी तर नेल्या जात नव्हत्या ना, असा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोलीस वाहनमालकाचा शोध घेत आहेत, तर जखमी गायींवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिक्षा केली जात आहे.
Last Updated : Jun 25, 2019, 7:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details