हिंगोली - दारूच्या नशेत वडील आईला मारत असल्याचे पाहून मुलगी त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेली. त्यावेळी रागाच्या भरात वडिलांनी पत्नीला मारताना मुलीच्या डोक्यात लोखंडी रॉड लागल्यामुळे यामध्ये 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. वैष्णवी विनोद भालेराव (वय 7) असे मृत मुलीचे नाव आहे.
पत्नीचे भावासोबत अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे पत्नीला मारहाण करताना लोखंडी रॉड मारला. मात्र, मुलगी मध्ये आल्याने तिचा माझ्या हातून खून झाला, असे आरोपी विनोद भालेराव याने पोलिसांना सांगितले आहे.
पत्नीचा करायचा होता खून, वार चुकला अन्... हेही वाचा -आई-वडिलांच्या भांडणात मुलीचा बळी; दारूड्या बापाने घातला डोक्यात रॉड
पत्नीचे भावासोबत अनैतिक संबंध सुरू असल्यामुळे विनोद आणि पत्नीमध्ये कायम वाद होत होते. विनोदने तिला अनेकदा समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीच्या वागण्यात काही बदल झाला नाही. विनोदचा भाऊही विनोदच्या भांडणाला कंटाळून हिंगोली येथे राहण्यासाठी गेला होता. मात्र, पत्नी अधून-मधून हिंगोलीला जात असल्याचे विनोदने सांगितले आहे.
रंगपंचमी दिवशी विनोद आणि त्याची पत्नी हे हिंगोली येथे भाऊ संग्रामकडे आले होते. त्यावेळी विनोद हा कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यानंतर विनोद भाऊ संग्रामच्या घरी आला तेव्हा संग्राम हा पत्नीसोबत अश्लील चाळे करत असल्याचे त्याला दिसले. त्यावेळी त्याने पत्नीचा खून करण्याचे ठरवले.
त्याच दिवशी ते घरी गेले. त्यावेळी रात्री जेवण झाल्यावर झोपताना पत्नीचा मोबाईल तपासला त्यामध्ये त्याला भाऊ संग्राम आणि पत्नीचे फोटो दिसले. त्यावेळी त्याने पत्नीला याबाबत विचारले, तेव्हा तिने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे विनोदने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा हातात रॉड घेऊन त्याने पत्नीच्या डोक्यात जोरात मारला. मात्र, पत्नीने वार चुकवला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मुलीच्या डोक्यात रॉड लागल्याने मुलगी जखमी झाली. विनोदने मुलीला नातेवाईकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -कुक्कुट व्यवसायिकाला कोरोनाने रडवले