हिंगोली - जिल्ह्यात झालेल्या अवकाळीपावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासन स्तरावर पंचनामे होत असले तरी, सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत कधी मिळणार हे मात्र अजून नक्की नाही. त्यामुळे हतबल होऊन एका शेतकऱ्याने राज्यपालांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. तहसीलदारामार्फत निवेदन देऊन त्यांनी ही परवानगी मागितली. सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील रहिवासी नामदेव पतंगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
बळीराजाने मागितली आत्महत्या करण्याची परवानगी; 'हे' आहे कारण
प्रशासन स्तरावर पंचनामे होत असले तरी, सरकार स्थापन झाले नसल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मदत कधी मिळणार हे मात्र अजून नक्की नाही. त्यामुळे हतबल होऊन सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील रहिवासी नामदेव पतंगे या शेतकऱ्याने राज्यपालांकडे आत्महत्या करण्याची परवानगी मागितली आहे. नामदेव यांच्या निवेदनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निवेदनावर राज्यपाल काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - शरद पवार पुन्हा दौऱ्यावर... विदर्भातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी साधला संवाद
नामदेव यांनी यापूर्वीदेखील कर्जमाफीसाठी मंत्रालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांचे 86 हजार रुपयांचे कर्ज माफ झाले होते. तर, खासगी कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी ताकतोडा हे गावच विक्रीसाठी काढले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती. सरकार स्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यातच, बँकांनी पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांनी खासगी कर्ज घेऊन आपली गरज भागवली. मात्र आता खासगी कर्जावरदेखाल व्याजदर वाढल्याने शेतकरी हैरान झाले आहेत. नामदेव यांच्या निवेदनामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्या निवेदनावर राज्यपाल काय निर्णय देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.