महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी - unseasonable rain

मागील वर्षी देखील अशाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला होता. या वर्षी देखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

unseasonable rain
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस

By

Published : Mar 9, 2020, 10:05 AM IST

हिंगोली - जिल्ह्यातील विविध भागात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने रब्बी हंगामातील विविध पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले.

हिंगोली जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री अवकाळी पावसाची हजेरी...

हेही वाचा....गोंदियात गारांसह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचे नुकसान

रविवारी मध्यरात्री हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या शेतात कापून टाकलेला गहू, ज्वारी, हरभरा आहे. हि सर्व पिके पावसामुळे पूर्णपणे भिजली आहेत. तसेच कापूस अन फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा...कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली

मागील वर्षी देखील अशाच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला होता. या वर्षी देखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सोमवारी सकाळ पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले असून, रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर इतर कामांचा देखील खोळंबा झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details