हिंगोली -कोरोना विषाणूमुळे दररोज उलट सुलट अफवा पसरवल्या जात आहेत. चिकन किंवा मटण खाल्ल्याने कोरोना रोग होत नाही हे राज्यशासनाने खूप वेळा सांगितले तरी लोक तयार नाहीत असेच दिसत आहे. त्यामुळे कुक्कुटपालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील दरेगाव येथील लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याने रागाच्या भरात त्रासाला कंटाळून 21 हजार जिवंत कोंबड्या पुरल्याचे समोर येत आहे.
कोरोनाच्या भीतीने हिंगोलीतल्या शेतकऱ्यानं 21 हजार कोबंड्या जिवंत पुरल्या हेही वाचा -भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 73 वर
कुकुटपालन व्यवसायिकांनी कोंबड्या मोफत देण्याचे आवाहन करूनही कोणी या कोंबड्याला फुकट विचारायला तयार नाहीत. त्यामुळे व्यवसायिक चांगलेच भांबावले आहेत. बुधवारी जिल्ह्यातील व्यवसायिकांनी एकत्र येऊन कोंबड्याची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तसेच आता कोंबड्या पाळणे कठीण होऊन बसल्याने पक्षी नष्ट करण्याची परवानगी मागितली होती.
आजकालच्या महागाईने कोंबड्यांचे संगोपन करणे शक्य होत नसल्याने भांबावलेल्या व्यवसायिकांनी आज जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून त्यात 21 हजार जिवंत कोंबड्या पुरल्या. कोंबड्या पुरत असताना मनामध्ये फार दुःख वाटत होते, जी पिल्ले लहानाची मोठी केली, त्यांची क्षणाक्षणाची पाहणी करून कोरोनामुळे ग्राहकांनी यांच्या खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे आज एवढे संकट येऊन ठेपले. असल्याचे शेतकरी लक्ष्मण जाधव यांनी सांगितले.