महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत शेतकऱ्याने कुटार जाळण्याऐवजी सोयाबीनच जाळले; परतीच्या पावसाने बळीराजा बेजार - farmers crisis latest news hingoli

मागील 2 दिवसांपासून लोकनेते दुष्काळग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी बांधावर फिरत आहेत. मात्र, पाहणी केल्यानंतर पंचनामे करण्यासाठी प्रशासन केव्हा येईल, किती दिवस त्याची प्रतीक्षा करावी लागणार? अजून किती नुकसान सहन करावे लागणार ? या सर्व विवंचनेतून शेतकऱ्यांनी कापून टाकलेले सोयाबीन जाळून टाकले आहे.

हिंगोलीत शेतकऱ्यांने कुटार जाळण्याऐवजी सोयाबीनच जाळले

By

Published : Nov 1, 2019, 6:54 PM IST

Updated : Nov 1, 2019, 7:41 PM IST

हिंगोली - दरवर्षी सोयाबीन मुबलक प्रमाणात झाल्यानंतर त्याचे निघालेले कुटार हे शेतकरी जाळून टाकतात. मात्र, या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. मागील 9 दिवसांपासून हजेरी लावलेल्या पावसामुळे गंजी लावलेले आणि उभे असलेले सोयाबीन पूर्णपणे भिजून गेले आहे. पंचनामे करण्यासाठी प्रशासन आज येईल उद्या येईल या प्रतीक्षेत शेतकरी दिवसामागून दिवस ढकलत आहेत. मात्र, कोणीच फिरकत नसल्याने सेनगाव तालुक्यातील जामदया येथील शेकुराव हगवणे या शेतकऱ्यांने कापून टाकलेले सोयाबीनच जाळून टाकत सरकारचा निषेध केला आहे. तसेच अजून 2 दिवस कोणी आलेच नाही तर गंजी देखील पेटवून देणार, असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.

हिंगोलीत शेतकऱ्याने कुटार जाळण्याऐवजी सोयाबीनच जाळले

जिल्ह्यात परतीच्या पावसाने सलग ९ दिवस थैमान घातले होते. यामध्ये १०० टक्के सोयाबीनसह इतर खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतांमध्ये तर अजूनही मोठ्या प्रमाणात साठलेल्या पाण्यात सोयाबीन डुबलेले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापलेल्या सोयाबीनची गंजी लावली आहे. मात्र, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे गंजीवरील कपडेदेखील उडून गेली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी थेट गंजीमध्ये शिरल्याने सोयाबीन पूर्णपणे सडून गेले आहे.

हेही वाचा -अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी - अण्णा हजारे

मागील 2 दिवसांपासून लोकनेते दुष्काळग्रस्त भागातील पाहणी करण्यासाठी बांधावर फिरत आहेत. मात्र, पाहणी केल्यानंतर पंचनामे करण्यासाठी प्रशासन केव्हा येईल, किती दिवस त्याची प्रतीक्षा करावी लागणार? अजून किती नुकसान सहन करावे लागणार? या सर्व विवंचनेतून शेतकऱ्यांनी कापून टाकलेले सोयाबीन जाळून टाकले आहे.

शेतामध्ये सर्वत्र पाणीच पाणी आहे. मात्र, एकही अधिकारी पाहणी करण्यासाठी आलेला नाही. सरकार आपल्या सत्तास्थापनेत व्यस्त आहे. एकंदरीत या घटनेतून शेतकऱ्यांचा आक्रोश समोर आला आहे. तर दुसरीकडे याच विवंचनेतून प्रकाश इंगोले नावाच्या शेतकऱ्याने देखील विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही घटंनेमुळे शेतकरी हा दुष्काळी परिस्थितीत कसा नडला आहे, हेच समोर आले आहे.

Last Updated : Nov 1, 2019, 7:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details