महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हळदीला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी घातला एकच गोंधळ - Haldi

मागील पाच ते सात दिवसांपासून हळदीची आवक वाढलेली आहे. यामध्ये दोन हजार पोते हळदीच्या पोत्यांची क्षमता असताना येथे तीन ते साडेतीन तर कधी कधी साडेपाच हजार पोते आवक होत आहे. मात्र, येथील व्यापारी हळदीची लिलाव करण्यास नेहमीच विलंब करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हळदीला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी घातला एकच गोंधळ

By

Published : Apr 14, 2019, 11:47 AM IST

हिंगोली -कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीच वेगवेगळ्या मुद्द्याने चर्चेत राहते. हळदीचा हंगाम सुरू झाले की या बाजार समितीचा बोलबाला मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे इतर जिल्ह्यातील शेतकरी येथे हळद विक्रीसाठी धाव घेतात. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचा हळद व्यापाऱ्यावर जराही वचक नसल्याने की, काय हळदीची लिलाव वेळेत होत नसावी. तर हळदीला कमी भाव दिला जात असल्याचे दुखणे नेहमीचेच आहे. आजही असाच प्रकार समोर आल्याने शेतकऱ्याने हळद बाजारामध्ये एकच गोंधळ घालत हळद देण्यास विरोध केला. यातून काही काळ व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक वादही झाला. नंतर विजय राऊत यांनी व शहर पोलिसांनी हळद बाजारात धाव घेतल्यानंतर हा वाद निवळला.

हळदीला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी घातला एकच गोंधळ

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीही हळद खरेदीच्या बाबतीत सर्वदूर प्रसिद्ध आहे. याठिकाणी हळद घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांचा सर्वात जास्त विचार केला जातो, असा नेहमीचाच बोलबाला आहे. जेव्हा जेव्हा शेतकरी हळद खरेदीसाठी घेऊन येतात, तेव्हा मात्र या कृषी उत्पन्न बाजार समितीचा खरा चेहरा समोर येतो. मागील पाच ते सात दिवसांपासून हळदीची आवक वाढलेली आहे. यामध्ये दोन हजार पोते हळदीच्या पोत्यांची क्षमता असताना येथे तीन ते साडेतीन तर कधी कधी साडेपाच हजार पोते आवक होत आहे. मात्र, येथील व्यापारी हळदीची लिलाव करण्यास नेहमीच विलंब करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हळदीला भावही कमी दिल्याचे शेतकरी सांगत आहेत. हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यामध्ये दोन हजार पोती हळदीची आवक क्षमता असताना तीन ते साडेतीन तर कधी साडेपाच हजार आवक होत आहे. मात्र, येथील व्यापारी हळदीचा लिलाव करण्यास नेहमीच विलंब करत असल्याची ओरड करतात. हळदीला भावही कमी दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, यार्डात हळद टाकल्यानंतर ती परत न्यावी तरी कशी नेण्यासाठी येणारा खर्च या सर्वांचे गणित लावत शेतकरी मिळेल त्या भावात हळद विक्री करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे येथे हळद घेऊन आल्यानंतर शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाच्या अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी करूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे भयंकर चित्र आहे. हळदीची आवक जास्त प्रमाणात झाल्यामुळे काटे करण्यास विलंब होत आहे. मात्र 'आम्ही शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन २० काटे खरेदी करत आहोत'' असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिश्‍चंद्र शिंदे हे मागच्या तीन ते चार दिवसापासून सांगत सुटले आहेत मात्र, अजून काटे खरेदीला मुहूर्त मिळालेला नाही.

त्यामुळे मोठ्या प्रतीक्षेनंतर हळदीची लिलाव झाल्यानंतरही काटे होण्याच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना ताटकळत बसण्याची वेळ अद्याप कायम आहे. त्यातच हळदीला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हैराण आहेत. आज हळदीला सहा ते साडे सहा हजार भाव मिळाला होता. या भावात हळद देण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांची हळद मार्केट यार्डमध्ये थप्पी लावून ठेवली आहे. आता त्यावर कृषी उत्पन्न बाजार समिती लक्ष ठेवणार असल्याचे सचिव महासेन प्रधान यांनी सांगितले. मात्र, असाच प्रकार अजून किती दिवस सुरू राहणार, असा सवाल शेतकरी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details