हिंगोली- संपूर्ण राज्यात आज(शनिवारी) दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही भाजपने दूध दरवाढीसाठी रास्तारोको आंदोलन केले. दुधाची दरवाढ करण्याची मागणी लावून धरत भाजपने ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र यावेळी पोलिसांनी रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले.
दूध दरवाढीसाठी हिंगोलीत भाजपाचा रास्तारोको, वाहनांच्या लांबलचक रांगा - दूध दरवाढ आंदोलन
प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. मात्र त्याच दुधाला पाण्यापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासाठी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यास दुधाला भाव मिळावा व गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, या मागण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्यात पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
अगोदरच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आता दुधाचे भाव वाढून न मिळत असल्यामुळे मोठे संकट कोसळत आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. मात्र त्याच दुधाला पाण्यापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासाठी दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यास दुधाला भाव मिळावा व गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये लिटर अनुदान व दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, या मागण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्यात पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यामध्ये भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हिंगोली शहरातील अग्रसेन चौक येथे रास्ता रोको केला. त्यामुळे दुतर्फा वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात त्याची नोंद केली व सोडून देण्यात आले. यावेळी भाजपा आमदार तान्हाजी मुटकुळे सह पदाधिकारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.