महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीज खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित... महावितरण विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन - agitation against MSEDCL in hingoli

विद्युत वितरण कंपनीकडून पंचनामा देखील करण्यात आलेला नाही. परिणामी, विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. अगोदरच कोरोनाने हादरुन गेलेल्या शेतकऱ्यांना वीज कंपनीचाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतातील बांधबर काळ्या फिती लावून आंदोलन केले.

farmers-agitation-against
महावितरण विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

By

Published : Jun 2, 2020, 2:55 PM IST

हिंगोली-कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यातच मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतातील वीजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे शेतातील वीजपूरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महावितरण विभागाने वीजेच्या खांबाची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील दाताडा बु.अजेंगाव गावातील शेतकऱ्यांनी काळ्या फिती लावून महावितरणच्या विरोधात आंदोलन केले आहे.

महावितरण विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन

हेही वाचा-चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग - महसूलमंत्री

कोरोनाने शेतकरी पूर्णपणे हादरुन गेला आहे. लॉकडाऊनने शेतकऱ्यांना शेतातील माल अजिबात हलवता आला नव्हता. आता कुठे शेतातील माल शिथीलता केल्याने, कसाबसा बाजारपेठेपर्यंत आणता येणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतात हळद कापसाचे पीक असून शेतकरी पिकांना पाणी देऊन त्यांना जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्य म्हणजे जंगली भागात असलेले तलाव पूर्णपणे कोरडे पडल्याने गुरांची पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. मात्र, शेतकरी ही भटकंती थांबविण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत असताना, विद्युत पोल पडल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

अजूनही विद्युत वितरण कंपनीकडून पंचनामा देखील करण्यात आलेला नाही. परिणामी, विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे. अगोदरच कोरोनाने हादरुन गेलेल्या शेतकऱ्यांना वीज कंपनीचाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आप आपल्या शेतातील बांधबर काळ्या फिती लावून आंदोलन केले. तसेच वीज पुरवठा वेळीच सुरळीत करण्याची मागमी गावातील सर्वच शेतकऱ्यांने केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details