हिंगोली - जिल्ह्यातील पारडा येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. प्रकाश साहेबराव मस्के (४५) असे मयताचे नाव आहे. मस्के हे पंधरा दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
तब्बल पंधरा दिवसानंतर शेतकऱ्याची आत्महत्या उघडकीस - Loan
मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात काही केल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यात १५ ते १६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. नुकतेच पारडा येथील शेतकरी प्रकाश मस्के यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.
पारडा येथील म्हस्के या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतदेह पुर्णतः कुजला होता. मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी सुटल्याने परिसरातील नागरिकांना शंका आली. त्यामुळे नागरिकांनी शोधाशोध केली असता, त्यांना एका झुडपात गळफास घेतलेल्या अवस्थेत मस्के यांचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. मस्के यांच्यावर स्टेट बँक आँफ हैदराबादचे कर्ज असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यात काही केल्या शेतकरी आत्महत्येचे सत्र कमी होत नसल्याचे चित्र आहे. सलग तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतात काहीच उत्पादन झाले नाही. उत्पन्न घटले आहे. क्विंटलने विक्री होणारा शेतमाल हा किलोवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे. शेतात निघालेल्या उत्पादनातून भांडवली खर्चही निघणे अवघड झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. हाती आलेल्या उत्पन्नातून डोक्यावरील कर्ज फेडायचे तरी कसे? या विवंचनेतुन अवघ्या दोन ते तीन महिन्यांत १५ ते १६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे.