महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...म्हणून दोन एकर बटाटा शेतात सोडली गुरे

कोरोनामुळे सुरु असलेल्या टाळेबंदी बाजार भाव मिळात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. हिंगोलीतील सापडगाव येथील एका शेतकऱ्याने आपल्या दोन एकर बटाट्याच्या पिकांमध्ये गुरे चरायला सोडली आहे.

By

Published : May 12, 2020, 1:26 PM IST

farmer
हवालदिल शेतकरी

हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे सर्वच बाजारपेठा, उद्योग ठप्प झाले आहेत. शेतकरीही अडचणीत सापडला आहे. आपल्या शेतात पिकवलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने हिंगोलीतील सापडगाव येथील शेतकऱ्याने बटाट्यांच्या पिकात गुरेच सोडली.

आपल्या व्यथा मांडताना शेतकरी
पिनू शिंदे असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. शिंदे हे दरवर्षी आपल्या शेतामध्ये नवनवीन पीक घेतात. यावर्षी त्यांनी दीड एकर शेतीमध्ये परिसरातील शेतकऱ्यांकडून बटाट्याचे बियाणं आणून लागवड केली. यावर्षी मृग नक्षत्रात अधूनमधून पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे पाणीपातळी चांगली आहे. त्यामुळे बटाट्याच्या पिकाला योग्य वेळेत पाणीही देता आले शिवाय खताच्या मात्रा अन् फवारणी देखील करता आली. त्यामुळे बटाट्याचे पीक चांगले आले होते. मात्र, काढणीच्या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी झाली. शासनाने जरी शेतीमालाला परवानगी दिली असली तरी योग्य तो भाव शेतीमालाला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण गणित कोलमडले आहे. यामुळे वैतागून त्यांनी शेतीमध्ये गुरे सोडली.

त्यांना बटाट्याच्या या विक्रीतून एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न होणार होते. त्या पैशातून ते खरीप पिकाची लागवड करणार होते. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांचे सर्व नियोजन कोलमडले. आता खरिपाच्या पेरणीसाठी आपल्या नातेवाईकांकडून काही मदत मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -दिलासादायक! हिंगोलीत एकाच दिवशी १७ रुग्ण कोरोनामुक्त

ABOUT THE AUTHOR

...view details