हिंगोली - वसमत तालुक्यातील अकोली येथे पुन्हा एका कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन स्वतःच्या शेतात आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. या प्रकरणी रघुनाथ बाबुराव सावंत यांच्या माहितीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुकाराम बाभनराव सावंत (वय-50) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी सावंत हे मागील काही दिवसांपासून नापिकीने चांगलेच हैराण झाले होते. यंदाही वाईट परिस्थिती आणि अशाच परिस्थितीत यंदा कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळ असलेला सर्व पैसा संपून गेला. आता कुटुंबाचा गाडा नेमका हाकायचा कसा? हा प्रश्न सावंत यांच्यासमोर उभा ठाकला होता. ते नेहमीच घरच्यांना डोक्यावर आलेल्या कर्जाची चिंता व्यक्त करीत असत. आज सकाळपासून ते घरातून अचानक गायब झाले होते.
हिंगोलीत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या - hingoli farmer suicide
तुकाराम बाभनराव सावंत (वय-50), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी सावंत हे मागील काही दिवसांपासून नापिकीने चांगलेच हैराण झाले होते. यंदाही वाईट परिस्थिती आणि अशाच परिस्थितीत यंदा कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जवळ असलेला सर्व पैसा संपून गेला.
तुकाराम बाभनराव सावंत
त्यामुळे त्यांच्या कुटुंबांनी त्यांचा शोध घेतला असता, स्वतः च्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरिक्षक बळीराम बंदखडके, पोलीस हवालदार बडे यांनी धाव घेतली. पंचनामा करून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला.