महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरुच... अतिवृष्टीने घेतला आणखी एका शेतकऱ्याचा बळी - शेतकरी आत्महत्या हिंगोली

गणेश चव्हाण हे अल्प भुधारक शेतकरी होते. मोठ्या मेहनतीने जोपासलेले आणि खर्च केलेले पीक अतिवृष्टीने हिरावले. रब्बी हंगामातही म्हणावे तसे पीक आले नाही. कर्जाचा डोंगर आणि शेतीत नुकसान यामुळे गणेश मागील काही दिवसांपासून चिंतेत होते.

farmer-committed-suicide-in-hingoli
farmer-committed-suicide-in-hingoli

By

Published : Feb 20, 2020, 8:05 PM IST

हिंगोली- जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही. कळमनुरी तालुक्यातील चिखलीत एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा-जामिया हिंसाचार: विद्यार्थ्यांना मारहाणप्रकरणी चौकशी सुरू; पोलिसांवर कारावाईची कुऱ्हाड

गणेश रामराव चव्हाण (वय 36) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गणेश हे अल्प भुधारक शेतकरी होते. मोठ्या मेहनतीने जोपासलेले आणि खर्च केलेले पीक अतिवृष्टीने हिरावले. रब्बी हंगामातही म्हणावे तसे पीक आले नाही. कर्जाचा डोंगर आणि शेतीत नुकसान यामुळे गणेश मागील काही दिवसांपासून चिंतेत होते. याच चिंतेतून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर करीत आहेत.

दरम्यान, गणेश यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details