हिंगोली-हिवरा परिसरात रस्त्याच्या कडेला गळफास घेतलेल्या अवस्थेत जो मृतदेह आढळून आला, त्याची ओळख पटली आहे. मृत व्यक्तीचे नाव सुभाष भोजे असून त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. खिशात असलेल्या आधार कार्ड मुळे त्यांची ओळख पटली. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
'त्या' मृत व्यक्तीची ओळख पटली; कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याने केली आत्महत्या - शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून आत्महत्या
सुभाष संभाजी भोजे हे सुकाळी ता. कळमनुरी असे येथील रहिवासी होते. त्यांच्यावर 4 लाख 25 हजार रुपयांचे कर्ज होते. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
सुभाष संभाजी भोजे हे सुकाळी ता. कळमनुरी असे येथील रहिवासी होते. भोजे यांच्यावर पाईपलाईन व पिक कर्जासाठी घेतलेले कळमनुरी शाखेचे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे तीन लाख रुपये तर हिंगोली येथील चोलामंडल फायनान्सचे बोलेरो जीप साठी घेतलेले 1 लाख 25 हजार रूपये असे एकूण चार लाख 25 हजार रुपयांचे कर्ज होते. मात्र,सततची नापिकी झाल्याने डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे कसे याच चिंतेत भोजे हे नेहमी राहात असत. दोन दिवसांपूर्वी अचानक ते घरून कामानिमित्त बाहेर पडले मात्र परत घरी आलेच नाहीत नातेवाईकांनी त्यांचा बराच शोध घेतला मात्र ते कुठेही सापडले नाहीत.
हिंगोली तालुक्यातील हिवरा जाटू परिसरात त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळतात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रामेश्वर सुभाष भोजे यांच्या खबरी वरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे