हिंगोली- वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. पांडुरंग मुंजाजी चव्हाण (वय 34) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोलीतील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच, कर्जबाजारीपणामुळे तरुणाने घेतला गळफास - हिंगोलीतील शेतकऱ्याची आत्महत्या
या शेतकऱ्यावर विविध राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतातून अत्यल्प पर्जन्यमानामुळे काहीही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे, डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत चव्हाण नेहमीच असायचे. त्यांनी याबाबत वारंवार कुटुंबीयांसोबत चर्चादेखील केली होती.
![हिंगोलीतील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच, कर्जबाजारीपणामुळे तरुणाने घेतला गळफास Farmer commits suicide in hingoli](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-09:27-mh-hin-03-debt-ridden-farmer-commits-suicide-7203736-03062020210601-0306f-1591198561-815.jpg)
या शेतकऱ्यावर विविध राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतातून अत्यल्प पर्जन्यमानामुळे काहीही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे, डोक्यावर असलेले कर्ज फेडायचे कसे, या चिंतेत चव्हाण नेहमीच असायचे. त्यांनी याबाबत वारंवार कुटुंबीयांसोबत चर्चादेखील केली होती.
बुधवारी पहाटे चव्हाण हे शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. ते उशिरापर्यंत घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये चव्हाण आढळून आले. याबद्दल माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. परिस्थितीने हतबल झालेले अनेक शेतकरी सध्या आत्महत्येचा पर्याय निवडत आहेत.