हिंगोली - सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथे अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मधुकर रामभाऊ गायकवाड (35) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हिंगोलीत शेतकऱ्याची कर्जबाजारीपणातून आत्महत्या - हिंगोलीत कर्जबाजारीपणातून शेतकऱ्याची आत्महत्या
निसर्गाने शेतीतील पिकांचे नुकसान केले आहे. तसेच दुसरीकडे हाताला काम मिळत नसल्याने हिंगोलीत एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
मधुकर गायकवाड यांच्याकडे २ एकर शेती आहे. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीमध्ये काहीच उत्पन्न होत नसल्याने ते कामच्या शोधात बाहेरगावी नेहमीच भटकंती करीत होते. यंदाही निसर्गाने शेतातील पिकाचे अतोनात नुकसान केले. बाहेरगावी गेल्यानंतरही काहीच काम न मिळाल्याने ते निराश झाले. गायकवाड हे मुंबई या ठिकाणी कामानिमित्त गेले होते. तेथे काम न मिळाल्याने ते परत आले. त्यावेळी पत्नी देखील माहेरी गेली होती. याच नैराश्यातून गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून माहिती मिळताच सेनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करणे सुरू आहे.