हिंगोली- सेनगाव तालुक्यातील सरकळी येथे शेतामध्ये काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुक्कराने हल्ला केला. यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, लस नसल्याचे कारण सांगत उपचार न करता खासगी अथवा नांदेड येथील रुग्णालयात नेण्याचा अजब सल्ला रुग्णालयातील डॉक्टराने दिल्याचा आरोप, या जखमी शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर; उपचारासाठी जाताच जिल्हासामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर - रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला
सेनगाव तालुक्यातील सरकळी येथे शेतामध्ये काम करत असलेल्या एका शेतकऱ्यावर रानडुक्कराने हल्ला केला आहे. यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हासामान्य रुग्णालयात हलविल्या गेले. मात्र, उपचार न करता लस नसल्याचे कारण सांगत खाजगी अथवा नांदेड येथील रुग्णालयात नेण्याचा अजब सल्ला रुग्णालयातील डॉक्टराने दिल्याचा आरोप, या जखमी शेतकऱ्याने केला आहे.
अंबादास किशन पाटोळे (४०) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. पाटोळे हे शेतामध्ये काम करीत होते. यावेळी अचानक त्यांच्या पाठीमागून रानडु्क्कर आले व त्याने पाटोळे यांच्यावर हल्ला केला. पाटोळे यांनी आरडाओरडा केली. मात्र, तरी देखील रानडुकर त्यांना धडका देत होता. जीव वाचविण्यासाठी ते जोरजोरात ओरडले. त्यांचे ओरडणे एकून परिसरात शेतीचे काम करणाऱ्यांनी पाटोळे यांच्या दिशेने धाव घेतली. त्यानी रान डुकराला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे रानडुक्कराने घटनास्थळावरून पळ काढला. रानडु्क्कराच्या हल्ल्याने पाटोळे यांच्या डाव्या हाताला व पोटाला गंभीर जखम झाल्या. त्यांच्या जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होते. त्यामुळे त्यांना तत्काळ जिल्हासामान्य रुग्णालयात हालविल्या गेले. मात्र, ओषधी नसल्याचे तेच ते रडगाने सांगून त्यांना डॉक्टरांनी इतरत्र जाण्याचा सल्ला दिला.
अतिशय हलाखीची परिस्थिती असलेल्या पाटोळे यांच्या पुढे उपचाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शेवटी एका खाजगी रुग्णालयात धाव घेऊन त्यांनी उपचार केला. हिंगोली जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतीची कामे मोठ्या लगबगीने करून घेत असताना वन्य प्राणी अशा प्रकारे हल्ले करत आहेत. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांतून होत आहे. तर या घटनेनंतर नुकसान भरपाईची मागणी पाटोळे यांनी केली आहे. मात्र, या घटनेमुळे जिल्हासामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार व अव्यवस्था समोर आला आहे.