महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 15, 2019, 2:38 AM IST

ETV Bharat / state

तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याला घातला 2 लाखाचा गंडा

व्यापारी अभयकुमार यंबल हे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील अॅक्सिस बँकेसमोरून जात होते. त्यावेळी अचानक समोरून 2 अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी यंबल यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगत त्यांनी यंबल यांच्याकडील 2 लाख 21 हजार 90 रुपयाची चैन आणि ब्रासलेट चोरले.

fake police cheat the trader in Hingoli
तोतया पोलिसांनी व्यापऱ्याला घातला 2 लाखाचा गंडा

हिंगोली- शहरात 2 तोतया पोलिसांनी एका व्यापाऱ्याला गंडा घातल्याचे समोर आले आहे. या तोतया पोलिसांनी व्यापाऱ्याकडून 2 लाख 21 हजार 90 रुपयांची सोन्याची चैन आणि ब्रासलेट लांबवले आहे. या प्रकरणी अभयकुमार यंबल यांनी 2 अज्ञात आरोपीविरुद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मुस्लिम समाज रस्त्यावर, हिंगोलीत मोर्चा

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यापारी अभयकुमार यंबल हे शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास शहरातील अॅक्सिस बँकेसमोरून जात होते. त्यावेळी अचानक समोरून 2 अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यांनी यंबल यांना थांबविले. आम्ही पोलिस आहोत, असे सांगत त्यांनी यंबल यांच्याकडील 2 लाख 21 हजार 90 रुपयाची चैन आणि ब्रासलेट चोरले. या प्रकाराने भांबावून गेलेले यंबल यांनी हा प्रकार आपल्या नातेवाइकांना सांगितला व थेट शहर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली.

हेही वाचा - रेल्वेसमोर उडी घेत तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तोपर्यंत तोतया पोलिसांनी पळ काढला होता. पोलीस या 2 तोतया पोलिसांचा तपास करत आहेत. याप्ररणी अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details