महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो' यात्रेदरम्यानच काँग्रेसमध्ये उफाळली गटबाजी - factionalism broke out in the Congress

काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गटबाजी होती, हे सर्वश्रुत असले तरी निदान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी ( MP Rahul Gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) हिंगोलीतुन जाणार असल्याने, गटतट सोडून सर्व नेते अगदी मनोमिलनाने काम करून, यात्रेचे उत्कृष्ठ रित्या स्वागत करतील, यात काही शंका नसली. तरी मात्र ऐन दौऱ्याच्या तोंडावर हिंगोली जिल्ह्यात दोन- दोन रॅली काढल्याने खरोखरच काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे दिसून आले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 8, 2022, 5:36 PM IST

हिंगोली : काँग्रेसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गटबाजी होती, हे सर्वश्रुत असले तरी निदान काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी ( MP Rahul Gandhi ) यांची भारत जोडो यात्रा ( Bharat Jodo Yatra ) हिंगोलीतुन जाणार असल्याने, गटतट सोडून सर्व नेते अगदी मनोमिलनाने काम करून, यात्रेचे उत्कृष्ठ रित्या स्वागत करतील, यात काही शंका नसली. तरी मात्र ऐन दौऱ्याच्या तोंडावर हिंगोली जिल्ह्यात दोन- दोन रॅली काढल्याने खरोखरच काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे दिसून आले.

हिंगोली जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत रॅली काढताना

जिल्ह्यात गटबाजी - हिंगोली जिल्ह्यात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि खा. राजीव सातव असे दोन गट आहेत. हे दोन गट एवढे चर्चेला आलेले आहेत, गटबाजीचा विषय हा वरिष्ठ नेत्यापर्यंत पोहोचला आहे. दिवंगत खा. राजीव सातव यांनी संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची एकत्रित मोठ बांधण्यासाठी प्रयत्न केल, त्याला काही प्रमाणात यश देखील आले होते.

हिंगोलीत कॉंग्रेसमध्ये दोन गट - राहुल गांधी यांच्या यात्रेनिमित्त पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यांमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये गटबाजी पडल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर व माजी खा. राजीव सातव असे दोन गट पडलेले असताना, माजी पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सर्वाधिक जास्त सातव यांच्याकडेच लक्ष दिले. दोन रॅली काढल्याने परत दोन गट असल्याचे स्पष्ट झाले. यात्रा दाखल होण्यापूर्वीच अजून कुठं कुठे गटबाजी दिसून येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details