हिंगोली -काहीच नाही आपण आपले कर्तव्य छान पद्धतीने पार पाडायचे, फळाची तुम्ही अजिबात अपेक्षा करू नका, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आपण धीर देणे नितांत गरजेचे असते. आपण त्यांच्यासाठी खुप महत्वाचे असतो, हीच ती योग्य वेळ आहे. आपले खरे कर्तव्य दाखवण्याची. त्यामुळे तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा, फळ तुम्हाला आपोआप मिळत असल्याचा सल्ला कोरोना वार्डमध्ये आठ दिवस राबलेल्या कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात येणाऱ्या जयश्री फत्तेपुरे यांनी कोरोनाला हरविण्यासाठी धडपड करणाऱ्या डॉक्टर, परिचरिकांना सल्ला दिला आहे. शल्यचिकित्सक किशोर श्रीवास म्हणतात हा पुरस्कार त्यांचा आहे, जे रात्रंदिवस कोरोनाला हरविण्यास धडपड करतात.
'तुम्ही निस्वार्थपणे सेवा करा, फळ तुम्हाला आपोआप मिळते' - hingoli awarded corona warrior news
जयश्री यांच्याकडून खरेच काही तरी शिकायला मिळते. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला अगदी सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळत गेली. आम्ही पण आमचे कर्तव्य बजावत गेलो, पुरस्कार, वैगरे आम्हाला मिळेल की नाही. याचे आम्हाला भान देखील नव्हते, फक्त काम अन वरिष्ठांच्या आदेशाचे पालन हेच आमच्यासाठी फार मोठा पुरस्कार आहे.
राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार मिळण्यासाठी जी सामान्य रुग्णालयातून यादी पाठवण्यात आली होती. ती यादी दुसरीच आहे. मेट्रनकडून आलेली यादी मुळात पाठवलीच गेली नसल्याने, खरे कोरोना योद्धे हे पुरस्कारापासून वंचित आहेत. त्यामुळे नावांची लिस्ट पाठवताना थोडा तरी विचार व्हायला होता असे काही परिचरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
एकाचा म्हणजे सर्वांचाच गौरव
राज्यपालांच्या हस्ते हिंगोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील दोघांची निवड केली म्हणजे सर्वांचीच निवड झाल्या सारखे आहे. दोघांचा गौरव होतो म्हणजे संपूर्ण रुग्णालयाचा गौरव होत आल्याचे तत्कालीन शल्यचिकित्सक किशोर श्रीवास म्हणाले.