हिंगोली- शहरातील रिसाला बाजार भागातील ईदगाहजवळून गणपती मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. अनेकदा अतिक्रमणधारकांना नगरपालिकेच्यावतीने सूचना देऊनही अतिक्रमण हटविण्यात येत नव्हते. त्यामुळे, सीओ रामदास पाटील यांनी स्वतः उभे राहून या रस्त्यावरील अतिक्रमण हटविले आहे. सोबतच रातोरात याठिकाणी पक्का रस्ता बनवला आहे.
हिंगोली नगरपालिकेने हटवले रस्त्यावरील अतिक्रमण, रातोरात बनवला पक्का रस्ता - हिंगोली नगरपालिकेने हटवले रस्त्यावरील अतिक्रमण
हिंगोली नगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमण करण्यात आलेल्या रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधितांना नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवण्याच्या सूचना अनेकदा दिलेल्या आहेत. मात्र, अतिक्रमण धारकांनी नगरपालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण हटवले नाही.
कित्येक वर्षानंतर रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे, या भागातील नागरिकांचा ये - जा करण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत झाली आहे. हिंगोली नगरपालिकेच्यावतीने शहरातील अतिक्रमण करण्यात आलेल्या रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधितांना नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्त्यावर केलेले अतिक्रमण हटवण्याच्या सूचना अनेकदा दिलेल्या आहेत. मात्र, अतिक्रमण धारकांनी नगरपालिकेच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अतिक्रमण हटवले नाही. त्यामुळे, नगरपालिकेने आता अतिक्रमण केलेल्या रस्त्यावर हातोडा चालवण्यास सुरुवात केली आहे.
रिसाला बाजार भागात ईदगाहजवळून गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. नगरपालिकेने सदरील अतिक्रमणधारकांना अनेकदा अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, अतिक्रमणधारक टाळाटाळ करत होते. त्यामुळे, नगरपालिकेचे रामदास पाटील यांनी मंगळवारी रिसाला बाजार येथे स्वतः थांबून रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण हटवले. एवढेच नव्हे तर सदरील रस्ता हा रातोरात बनविण्यात आला. त्यामुळे, भागातील नागरिकांनी या कामासाठी पालिकेचे आभार मानले.