हिंगोली - दिवसेंदिवस वीज चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. यातच जिल्ह्यातील किन्होळा गावामध्ये अनधिकृत वीज तोडणीचे कार्य करत असलेल्या महावितरणाच्या अधिकाऱ्यालाचा गावकऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोर तो चोर वर शिरजोर! अनधिकृत वीज तोडणी करणाऱ्या अधिकाऱ्याला धक्काबुक्की - hingoli electricity Thief
किन्होळा गावामध्ये अनधिकृत वीज तोडणीचे कार्य करत असलेल्या महावितरणाच्या अधिकाऱ्यालाचा गावकऱ्यांनी धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरगाव येथील महावितरण शाखेचे वरिष्ठ तंत्रज्ञ राजू आवटे हे किन्होळामध्ये अनधिकृत वीज जोडणीचे अकोडे तोडण्याचे काम करत होते. तेव्हा आरोपी मेनाजी कामोरेने अधिकाऱ्याशी अरेरावीची भाषा करत, काढलेला आकोडा परत टाक, नाहीतर हात-पाय तोडून गावाच्या बाहेर हाकलून देईल, अशी धमकी दिली. यावेळी इतरांनी आवटे यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात आडथळा निर्माण केला. याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल पांडुरंग खंदारे, योगेश गंगाधर आवटे, हनुमंत हुगमा संगेपाड, संदीप मधुकरराव इंगोले, प्रवीण कुमार उत्तम चव्हाण, श्रीराम महाजन येरवाड, अनिल सुभाषराव अवकळे, विनोद चंदर वाघमारे अशी आरोपीची नावे आहेत.