महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोली जिल्हा परिषदेत रिकाम्या खुर्च्या घेतात पंख्याची हवा; वीज बचतीची घोषणा वाऱ्यावर - हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली जिल्कहा परिषदेतील कक्षात कुणीही नसताना एसी, पंखे, लाईट सर्वच्या सर्व उपकरणे सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा विभाग वीज बचतीसाठी किती सजग आहे? हेच आजच्या परिस्थिती वरून दिसून येते.

हिंगोली जिल्हा परिषेदतील वीजेचे उपकरणे सुरू असलेले कक्ष

By

Published : Jul 20, 2019, 4:37 PM IST

Updated : Jul 20, 2019, 8:50 PM IST

हिंगोली - जिल्हा परिषद नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहत असते. आता पुन्हा या जिल्हा परिषदेतील रिकाम्या खुर्च्या पंख्याची हवा खात असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सरकार वीज बचत करण्यासंदर्भात आव्हान करत असते. दुसरीकडे मात्र, या कार्यालयात कुणीही नसताना वीजेवरील उपकरणे सुरू राहतात. त्यामुळे सरकारच्या वीज बचतीच्या धोरणाला जिल्हा परिषद अपवाद आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.

हिंगोली जिल्हा परिषदेत रिकाम्या खुर्च्या घेतात पंख्याची हवा

राज्यात नेहमीच वीजेचा तुटवडा पाहायला मिळतो. ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असतो. अपुऱ्या वीजेमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार केली असता अधिकारी नियमावर बोट ठेवतात. वीजेची बचत होण्यासाठी प्रशासन आणि सरकार नागरिकांना वीजेचा कमी वापर करण्याचे आवाहन करतात. मात्र, हिंगोली जिल्हा परिषदेच्या विविध प्रशासकीय विभागात आणि पदाधिकाऱ्यांच्या कक्षात वीजेवर चालणारे उपकरणे सर्रास सुरू असतात.

कक्षात कुणीही नसताना एसी, पंखे, लाईट सर्वच्या सर्व उपकरणे सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे हा विभाग वीज बचतीसाठी किती सजग आहे? हेच आजच्या परिस्थिती वरून दिसून येते. हा प्रकार केवळ एका दिवसाचा नाहीतर नेहमीच जिल्हा परिषदेत वीजेचा दुरुपयोग केला जात असल्याचे समोर आले आहे.

Last Updated : Jul 20, 2019, 8:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details