महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिंगोलीत सौभाग्य योजनेचा बोजबारा; वीज जोडणी नसतानाही बिल लाभार्थ्यांच्या माथी - मीटर

ओंढा नागनाथ तालुक्यातील भोसी या आदिवासी बहुल गावात सौभाग्य योजनेअंतर्गत चाळीसच्यावर मीटर बसवण्यात आलेले आहेत. मात्र, बहुतांश ग्राहकांच्या भिंतीला मीटर जोडलंय, अन विद्युत पुरवठा सुरूदेखील केलेला नाही. अनेकदा लाभार्थ्यांनी संबंधित कंत्राटदाराकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या तक्रारीची दखल न घेता तशाच अवस्थेमध्ये मीटर सोडून दिलेत. तरीदेखील संबंधित लाभार्थ्यांना बिले आलेली आहेत. एकदा नव्हे तर चक्क चार चार वेळा बिले आली आहेत.

हिंगोली

By

Published : Aug 2, 2019, 8:24 PM IST

Updated : Aug 2, 2019, 8:39 PM IST

हिंगोली- विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराने ग्राहक चांगलेच वैतागून गेले आहेत. कधी रिडींग न घेता तर रिडींग घेऊन अव्वाच्या सव्वा बिल माथी मारले जाते. आता तर चक्क सौभाग्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरात मीटर बसवले. परंतु, जोडणीच केली नाही आणि अमाप बिल दिले. ते ही एकदा नव्हे तर चार चार वेळा बिल दिल्याचा प्रकार जिल्ह्यातील भोसी या गावातील भिकाजी नामदेव चिकलकर यांच्या घरी उघडकीस आला. येथील जवळपास वीस ते बावीस ग्राहकांना असेच बिले आलेली आहेत. त्यामुळे ग्राहक चांगलेच भांबावून गेले आहेत.

वीज जोडणी नसतानाही बिल लाभार्थ्यांच्या माथी

जिल्ह्यात सौभाग्य योजनेअंतर्गत 42 हजार लाभार्थ्यांना विद्युत मीटर जोडणी केली आहे. मात्र, जेव्हापासून या योजनेअंतर्गत विद्युत जोडणी सुरू झाली तेव्हापासून मीटर लावण्याची संख्या कमी पण तक्रारीची संख्या सर्वाधिक जास्त सुरू होती. ज्यांना मीटर बसविण्याचे कंत्राट दिले ते कंत्राटदार कुठे वायर देत नव्हते तर कुठे बोर्ड देत नव्हते, त्यामुळे ग्राहक चांगलेच वैतागून गेले होते. अजूनही बऱ्याच लाभार्थ्यांना नावालाच मीटर दिलेली आहेत.

मीटर बसवले मात्र वीज जोडणी नसतानाही बिल लाभार्थ्यांच्या माथी

ओंढा नागनाथ तालुक्यातील भोसी या आदिवासी बहुल गावात सौभाग्य योजनेअंतर्गत चाळीसच्यावर मीटर बसवण्यात आलेले आहेत. मात्र, बहुतांश ग्राहकांच्या भिंतीला मीटर जोडलंय, अन विद्युत पुरवठा सुरूदेखील केलेला नाही. अनेकदा लाभार्थ्यांनी संबंधित कंत्राटदाराकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या तक्रारीची दखल न घेता तशाच अवस्थेमध्ये मीटर सोडून दिलेत. तरीदेखील संबंधित लाभार्थ्यांना बिले आलेली आहेत. एकदा नव्हे तर चक्क चार चार वेळा बिले आल्यामुळे भोसे येथील लाभार्थी चांगलेच भांबावून गेलेत. हा प्रकार केवळ भोसी या गावातच नव्हे तर, जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये उघड झाला असल्याचे समोर आले.

यासंदर्भात विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, 'चुकून झाले असावे,' आम्ही ती चूक लवकरच दुरुस्त करून देऊ, असे जाधव यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या सौभाग्य योजनेची मीटरे बसवताना बऱ्याच कंत्राटदारांनी लाभार्थ्यांकडून पैसेदेखील उकळण्याच्या तक्रारी आल्या होत्या.

आता खरोखरच अधीक्षक अभियंता भोसरी येथील गावातील विद्युत मीटरची पाहणी करून जोडणी करून देतात की, त्या कंत्राटदारावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Last Updated : Aug 2, 2019, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details