हिंगोली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने शिखर बॅंक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा सुडबुद्धीने दाखल केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आंदेलन करण्यात आले. हिंगोली-नांदेड रस्त्यावरील खटकाळी बाय पास रोडवर टायर जाळून हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. तर सेनगाव अन् वसमत येथे बंद पाळला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एवढे आक्रमक झाले होते की, त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
शरद पवारांवरील कारवाईच्या निषेधार्थ हिंगोलीत आंदोलने - शिखर बॅंक घोटाळा
हिंगोली येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव जावेद राज यांच्या नेतृत्वाखाली हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. वसमत आणि सेनगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती. याला व्यापारी, दुकानदार, व्यवसायिकांनी प्रतिसाद दिला. मात्र, आरोग्य सेवा सुरू ठेवण्यात आली होती.
हेही वाचा-शरद पवारांना अडचणीत आणणारी ‘ईडी’ नक्की आहे तरी काय?
हिंगोली येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सचिव जावेद राज यांच्या नेतृत्वाखाली हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. वसमत आणि सेनगाव शहर बंदची हाक देण्यात आली होती. याला व्यापारी, दुकानदार, व्यवसायिकांनी प्रतिसाद दिला. मात्र, आरोग्य सेवा सुरू ठेवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.