हिंगोली- कोरोनाने भयभीत झालेल्या नागरिकांमध्ये गावात भूकंपाचे हादरे बसल्यामुळे अधिकच धास्ती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 15 गावांमध्ये सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे घाबरलेल्या ग्रामस्थांनी रस्त्यावर धाव घेतली. रविवारी कळमनुरी तालुक्यातील सिंदगी व पोतरा या दोन गावात भूकंपाचे धक्के धक्के जाणवले होते. तेव्हापासून या भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हिंगोली जिल्ह्यात पंधरा गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - हिंगोली भूकंप
रविवारी झालेल्या भूकंपाची 3.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. तर सोमवारी रात्री झालेल्या भूकंपाची कुठेही नोंद झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा, कुरुंदवाडी, दांडेगाव, कोठारी, पांगरा, पांगरा शिंदे, डोनवाडा, सुकळी, खांबाळा, गिरगाव, पारडी बुद्रुक, मुरुंबा, आंबा चोंडी, किन्होळा, तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, नांदापूर या गावांमध्ये सोमवारी रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जमिनीतून हादरा बसल्यानंतर ग्रामस्थांनी जीव वाचविण्याच्या आकांताने रस्त्यावर धाव घेतली. एकीकडे संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे थैमान सुरू असताना जिल्ह्यात भूकंपाचे हादरे जाणवल्याने नागरिक चांगलेच भयभित झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी झालेल्या भूकंपाची 3.4 रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे. तर सोमवारी रात्री झालेल्या भूकंपाची कुठेही नोंद झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळाली आहे.
या सर्व गावातील ग्रामस्थ हे कोरोनाने भयभीत झालेले आहे. त्यात आता भूकंप होत असल्याने, ते खूपच दहशतीखाली आले आहेत. या भागात नेहमीच भूकंपाचे सौम्य धक्के अधून-मधून जाणवतात.