हिंगोली -हिंगोली जिल्ह्यातील काही भागात आज रात्री सव्वा नऊच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले तर, कुरुंदा परिसरात जमिनीतून गूढ आवाज येत असल्याने नागरिक भयभीत झाले होते. जमिनीतून तीन ते चार सेकंद आवाज येत असल्याचे कुरुंदा भागातील ग्रामस्थ सांगत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के, कुरुंदा परिसरात जमिनीतून गूढ आवाज - भूकंपाचे सौम्य धक्के
हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील हिवरा, कामठा फाटा, येलकी, येहळेगाव, जवळा पांचाळ या भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील हिवरा, कामठा फाटा, येलकी, येहळेगाव, जवळा पांचाळ या भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. पांगरा शिंदे येथे नेहमीच भूगर्भातून येणारा आवाज मात्र यावेळेस आला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
भूकंपाची सविस्तर माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून रात्रीपर्यंत घेणे सुरूच होते. मात्र कुठेही जमिनीला तडे किंवा जिल्ह्यातील कुठल्याही भागात पडझड झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाकडून मिळाली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.