भूगर्भातील आवाजाने ग्रामस्थ घाबरले हिंगोली :कळमनुरी व औंढा नागनात तालुक्यातील ( earthquake Kalamanuri and Aundha Naganat ) अनेक गावांमध्ये आज पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याची तीव्रता 3.6 स्केल रिश्टर एवढी भूमापक केंद्रावर नोंद झाली आहे. जवळपास 40 ते 50 गावांमध्ये हे धक्के जाणवले ( earthquake in 40 to 50 village in hingoli ) आहेत. अचानक पहाटे - पहाटे साखर झोपेमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वारंवार येणाऱ्या आवाजांमुळे ग्रामस्थ हैराण : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदरी, कंजारा पूर, वसई, जामगव्हाण, जलाल धाबा, काकड धाबा, तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी कळमनुरी तालुक्यातील बोथी दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, असोला आदी गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. वसमत कळमनुरी औंढा नागनाथ या तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून जमिनीतून गुड आवाज येण्याचे सत्र सुरू आहे. या भागात अनेक संशोधकांनी भेट देऊन जमिनीची पाहणी केली. मात्र भूगर्भातील सूक्ष्म हालचालीमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र वारंवार येत असलेल्या आवाजामुळे या भागातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झालेले ( earthquake in hingoli ) आहेत.
नागरिकांना झाली गुड आवाजाची सवय :रविवारी पहाटे साडेचार वाजता जमिनीमधून भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे पिंपळदरी येथील अनेक ग्रामस्थांनी घराबाहेर धाव घेतली. आतापर्यंत झालेल्या भूकंपापैकी आज मोठा आवाज जमिनीतून ( Villagers scared by underground noise ) आल्याचे पिंपळदरी येथील ग्रामस्थ बापूराव घोंगडे यांनी सांगितले. वारंवार येत असलेल्या आवाजामुळे नागरिकांना जणू काय या आवाजाची सवयच होऊन गेली आहे. पहाटे पहाटे झालेल्या भूकंपाची 3.6 एवढी भूमापक केंद्रावर नोंद झाली असून यामध्ये कुठेही हानी झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून न जाण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने केले आहे.
नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज : वसमत कळमनुरी औंढा नागनाथ तालुक्यातील आदि गावांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जमिनीमधून गुड आवाज येण्याचे सत्र हे सुरू आहे या भागातील नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितलेले आहे. हा नेहमीचाच प्रकार असल्याने या भागातील नागरिकांना जणू काही या भूकंपाची सवयच झाल्याचे बोलले जात आहे थोडी ही जमीन हल्ली तर ग्रामस्थ आपसूक घराबाहेर धाव घेतात आणि मोकळ्या जागी जाऊन थांबतात हा प्रकार केव्हा थांबेल त्याच्यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.