महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यास वाहतूक शाखेचा दणका

खानापूर चित्ता गावाजवळ कारचे जोराने ब्रेक मारल्यामुळे सायकलवरुन प्रवास करणाऱ्या एका शाळकरी मुलाचे प्राण थोडक्यात वाचले. पोलिसांनी या गाडी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

दारू पिऊन भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्यास वाहतूक शाखेचा दणका

By

Published : Oct 3, 2019, 9:26 PM IST

हिंगोली- सध्या दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. असाच एक तळीराम भरधाव वेगाने कार चालवत कळमनुरीकडून हिंगोली येत होता. खानापूर चित्ता गावाजवळ कारचे जोराने ब्रेक मारल्यामुळे सायकलवरुन प्रवास करणाऱ्या एका शाळकरी मुलाचे प्राण थोडक्यात वाचले. ही बाब सजग नागरिकांनी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांना सांगितली. त्यांनी काही वेळात चारचाकी वाहन ताब्यात घेतले. यातील चालक दारुच्या नशेत गाडी चालवत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा-जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे कुटुंबीय उपस्थित

हिंगोली शहर वाहतूक शाखा गेल्या काही दिवसांपासून वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्वी शहरात जगोजागी वाहने लावली जायची. मात्र, वाहतूक शाखेने टोईंगद्वारे वाहतुकीला खरोखरच शिस्त लावली आहे. तसेच शिस्त न पाळणाऱ्यास दंड ही आकारला आहे. त्यामुळे नेहमीच बेशिस्त वाहने लावणाऱ्याला चाप बसला आहे. (एम. एच. ३८ ४०७४) या क्रमांकाच्या कारने एक सायकल स्वार शाळकरी मुलगा थोडक्यात बचावला. चालक वेगाने वाहन चालवून कळमनुरी ते हिंगोली या रस्त्यावर दहशत निर्माण करत होता. ही बाब काही सजग नागरिकाने वाहतूक शाखेला कळविताच वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परतेने त्या गाडीला खटकाळी भागातील रेल्वे गेट जवळ गाडी ताब्यात घेतली. चालकाची तपासणी केली. त्यात चालक दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरील गाडी चालकांवर गुन्हा दाखल केला. वाहतूक शाखेच्या या कर्तव्याचे नागरिकांतून स्वागत होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details